असे ही आहेत कोल्ड ड्रिंक्सचे फायदे

cold-drink
आता अवघ्या काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे काही जण आपली तहान भागविण्यासाठी पाण्याचा तर काहीजण कोल्ड ड्रिंक्सचा आधार घेतात. पण कोल्ड ड्रिंक्सचे अतिसेवन आपल्या शरीराला हानीकारक आहे आपल्याला माहितच आहे. पण याच कोल्ड ड्रिंक्सचा वापर आपल्या घराच्या साफसफाईमध्येही कामी येत असल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. कोल्ड ड्रिंक्सचा वापर फक्त तहान भागविण्यासाठी नाही तर त्याचा वापर इतर अन्य कामांसाठी केला जाऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या कोल्ड ड्रिंक्सच्या इतर फायद्यांबाबत.
cold-drink1
त्यामध्ये सर्वात प्रथम याचा वापर तुम्ही तुमच्या बागेत करु शकता. कोल्ड ड्रिंक्सच्या वापराने तुम्ही तुमच्या बागेतील किडे मारु शकता. यासाठी तुम्हाला एक बाऊल घेऊन त्यात कोल्ड ड्रिंक ओतावे आणि ते तुमच्या बागेत ठेवावे. त्यामुळे त्याच्या वासाने हे किडे त्या वासाकडे आकर्षित होतील आणि त्यांचा नायनाट होईल.
cold-drink2
कोल्ड ड्रिंक्सच्या वापराने तुम्ही तुमच्या कारच्या विंडशील्डमध्ये जमा झालेला बर्फ देखील काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कारच्या विंडशील्ड कोल्ड ड्रिंक टाकावे लागेल. त्यानंतर एक मिनिट थांबून तुम्ही त्या विंडशील्डवर जमलेला बर्फ काढू शकता.
cold-drink3
त्याचबरोबर कोल्ड ड्रिंकचा वापर तुमच्या स्वयंपाकघरातील साफसफाईसाठी देखील करु शकता. विशेष करुन कोल्ड ड्रिंकच्या मदतीने तुम्ही तुमची करपलेली भांडी देखील साफ करु शकता. यासाठी तुम्हाला करपलेल्या भांड्यामध्ये कोल्ड ड्रिंक टाकून काही वेळासाठी ठेवावे लागेल. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही भांडी घासाल तेव्हा तुमचे करपलेले भांडे एकदम चकाचक झालेले असेल.
cold-drink4
कोल्ड ड्रिंकचा आणखी एक वापर म्हणजे गंज लागलेल्या वस्तु साफ करण्यासाठी देखील होऊ शकतो. यासाठी तुम्हाला गंज लागलेल्या वस्तुवर काळ्या रंगाचे कोल्ड ड्रिंक टाकावे लागेल. त्यानंतर तुमची ती गंज लागली वस्तु एका झटक्यात साफ होऊन जाईल. याचा वापर तुम्ही तुमच्या गाडीसाठी देखील करु शकता.
cold-drink5
आता जो वापर तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही हैराण व्हाल. कोल्ड ड्रिंकचा वापर तुम्ही तुमच्या कपड्यांना लागलेले आणि न जाणारे डाग काढण्यासाठी देखील करु शकता. कपड्यावर लागलेले ग्रीस किंवा रक्ताचे डाग याच्या वापराने सहजतेने काढू शकता. त्याचबरोबर याचा वापर करताना एक खबरदारी घ्यावी लागेल ती म्हणजे हे कोल्ड ड्रिंक ब्राउन रंगाचे असल्यामुळे फिकट रंगांच्या कपड्यांवर त्याचा वापर करू नका.
cold-drink6
आपल्या घरी लहान मुले असतातच आणि लहान मुले म्हटली कि थट्टा मस्करी चालतेच. पण कधी कधी या मस्करीची कुस्करी होते. आपल्या मुलाच्या मस्करीमध्ये त्याच्या केसाला कोणीतरी चुकुन किंवा जाणून बुजुन च्युइंगगम लावतो. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाचे केस कापावे लागतात. पण आता घाबरु नका कारण च्युइंगगम लागलेल्या केसांच्या भागात कोल्ड ड्रिंक टाकल्यामुळे ते च्युइंगगम आपसुक निघुन जाईल.

Leave a Comment