रणवीर सिंह राखी सावंतला मानतो रॉक स्टार

ranveer-sing
आपल्या हटके स्टाईलमुळे बॉलीवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने बॉलीवूडच्या ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत बाबत एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सगळेच अव्वाक झाले आहे.

रणवीर सिंहने आपल्या गली बॉयच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत त्याला सिनेसृष्टीत तु कोणाला रॉकस्टार मानतो असा प्रश्न विचारला असता. त्याने चक्क राखी सावंतचे नाव घेत ती मला खुप आवडते असे म्हटले आहे. रणवीरला मुलाखती दरम्यान दीपिका आणि बहिण रितीका भवनानी देखील आपल्या खुप जवळ असल्याचे म्हटले आहे.

आपल्या हटके स्टाईल आणि मनमिळावू स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच सोबत तो आपले काही अतरंगी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. रणवीर सिंह गली बॉय हा चित्रपट या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. यात तो एका रॅपरच्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याने रॅप साँग देखील गायली आहेत.