‘या’ टिव्ही होस्टने 10 वर्षांपासून धुतले नाहीत हात, पाहा व्हिडिओ

handwash

आपण शाळेत असल्यापासुन शिकविले जाते जेवण्याआधी हात स्वच्छ धुवावेत. मात्र एका टिव्ही होस्टने तब्बल 10 वर्षांपासून आपले हात धुतलेले नाहीत.

अमेरिकेत एका टिव्ही होस्टने असे सांगितले की, त्याने 10 वर्षांपासून आपले हात धुतले नाहीत कारण ‘जीवाणूसारखी कोणती गोष्टी अस्तित्वातच नाही’. तो म्हणाला की, जीवाणूला मी पाहू शकत नाही, म्हणून या सर्व गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही.

tv-host

फॉक्स न्यूजचे होस्ट पीट हेगसेथ म्हणाले, संक्रामक सूक्ष्मजीव अस्तित्वात नाहीत कारण ते डोळ्यांनी दिसत नाहीत. रविवारी कार्यक्रमाचे को-होस्ट आणि हेनरी, जेडेडिया बिला यांनी खाण्याविषयी चर्चा सुरु केली तेव्हा पीट हेगसेथ यांनी हा खुलासा केला. नंतर त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे हे वक्तव्य मस्करी म्हणून केले होते आणि ते म्हणाला की, लोक स्वच्छतेबद्दल खुप जास्तच सतर्क आहेत.

हेगसेथने ‘यूएसए टुडे’ वृत्तपत्राला सांगितले की, “आम्ही अशा समाजात राहतो जिथे लोक आपल्या पर्समध्ये प्यूरेल (हॅण्ड सॅनिटायझर ) घेऊन फिरतात आणि ते दिवसातून 19, 000 वेळा त्याचा वापर करतात, जसे की सॅनिटायझरमुळेच लोकांचा जीव वाचणार आहे.

 

Leave a Comment