नुबिया आणणार वेअरेबल स्मार्टफोन

nubia
चीनी कंपनी नुबिया बार्सिलोना येथे २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये वेअरेबल स्मार्टफोन सादर करणार असल्याचे वृत्त आहे. हा फोन अल्फा नावाने येईल. तो मनगटावर घड्याळाप्रमाणे बांधता येणार आहे.

या फोनला फोल्डेबल डिस्प्ले दिला गेला असून त्यासाठी प्रथमच फ्लेक्सिबल डिस्प्ले टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. कर्व्हड ग्लास डिस्प्लेच्या फ्रंटला कॅमेरा आहे शिवाय मायक्रोफोनही दिला गेला आहे. फोनच्या दोन्ही बाजूला बटणे असून मागे चार्जिंग पिन आणि हार्टरेट सेन्सर दिला गेला आहे.

कंपनीने अल्फा प्रोटोटाईप गेल्या वर्षी बर्लिन येथील आयएफअ मध्ये सादर केला होता पण तो डमी होता. आता नवा अल्फा ग्लोबली लाँच केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हा फोन ४ जी ला सपोर्ट करेल मात्र त्याची अन्य स्पेसिफिकेशन बाबत खुलासा केला गेलेला नाही.

Leave a Comment