लग्नाचा भलाथोरला गाऊन- झाले गिनीज रेकॉर्ड

gawn
आपणही एखादे रेकॉर्ड नोंदवावे अशी इच्छा अनेकांना होत असेल. लहानपणापासून अशी इच्छा असलेल्या सायप्रस येथील मारिया हिने तिची बालपणापासूनची इच्छा विवाहाच्या वेळी पूर्ण केली असून जगातील सर्वाधिक लांबीचा वेडिंग गाऊन घालून तिने तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे.

मारियाने विवाहाच्यावेळी हा ७ हजार मीटर लांबीचा गाऊन घातला. अर्थात त्याचे डिझाईन तिने अगोदरच केले होते पण तो शिवण्यासाठी कारागीर मिळविणे अवघड बनले होते. अखेर ग्रीसच्या एका कंपनीने त्यासाठी तयारी दाखविली आणि हा अवाढव्य गाऊन बनविला. त्यासाठी ३ लाख १८ हजार खर्च आला आणि गाऊनचा कपडा बनविण्यासाठी ३ महिने लागले. त्यासाठी १ हजार मीटर लांबीचे ७ रोल तयार केले गेले. विवाहादिवशी ट्रकच्या मदतीने ते मैदानात आणून रोल सोडले गेले. हा पसारा अमेरिकन फुटबॉलची ६३ मैदाने झाकली जातील इतका होता..

वधूला विवाहवेदीवर नेताना गाऊनचा हा पिसारा उचलण्यासाठी ३० लोक ६ तास उभे होते. गिनीज बुकची टीम या गाऊनची लांबी मोजण्यासाठी हजर होती. त्यांना त्यासाठी भलामोठा टेप तयार करावा लागला आणि सिव्हील इंजिनिअरची मदत त्यासाठी घ्यावी लागली. मारियाने या कामी मदत केलेल्या सर्वांचे आभार मानताना त्याच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते अशी भावना बोलून दाखविली.

Leave a Comment