बोईंग ७४७ विमानात ३३ खोल्यांचे हॉटेल

hotel2
स्टॉकहोम येथील अर्लांडा विमानतळावर एका बोईंग ७४७ विमानात चक्क ३३ खोल्या असलेले हॉटेल बनविले गेले आहे. त्यात विमानच्या इंजिन आणि कॉकपिटमध्येही स्यूट बनविले गेले आहेत. प्रवासी त्यांच्या गरजेनुसार सिंगल डबल रूम अथवा स्युट बुक करू शकतात. या विमान कम हॉटेल मध्ये व्हीआयपी लाउंज, बार, कॅफेची सुविधा दिली गेली आहे.

hotel1
मिळालेल्या माहितीनुसार १९७६ साली हे विमान सिंगापूर येथे बनले होते.ते ब्रिटीश एअरलाईन ट्रान्सजेटच्या ताफ्यात होते. २००२ साली या कंपनीचे दिवाळे वाजले. तेव्हा मालक ऑस्कर डिओस याने या विमानाचे हॉटेल मध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

hotel
आता हे विमान जम्बो स्टे नावाच्या हॉटेल मध्ये बदलले गेले आहे. येथील स्टाफला केबिन क्रू असेच म्हटले जाते. इतकेच नव्हे तर त्यांचा गणवेश विमान क्रू सारखाच आहे. हॉटेल पर्यंत येण्यासाठी प्रवासी लोकांना फ्री शटल बस सेवा दिली गेली आहे.

Leave a Comment