कारपेक्षा महाग इलेक्ट्रिक स्कूटर

scooter
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत चालल्याने ग्राहकांची गरज ओळखून वाहन उत्पादक कंपन्या नवी उत्पादने विकसित करण्यात गुंतल्या आहेत त्यात लग्झरी बाइक निर्माती हार्ले डेव्हिडसनही मागे नाही. या कंपनीने नुकतीच दोन कन्सेप्ट वाहने सादर केली असून वेगळ्या आणि स्टायलिश डिझाईनमुळे त्यांची चर्चा आत्ताच सुरु झाली आहे.

mountain
ही वाहने म्हणजे एक इलेक्ट्रिक स्कूटर तर दुसरी माउंटन बाईक आहे. अमेरिकेतील एक्स गेम्स इव्हेंटमध्ये ही स्कूटर आणि बाईक सादर केली गेली आहे. प्रामुख्याने युवा वर्गाला नजरेसमोर ठेऊन त्यांचे डिझाईन केले गेले आहे. या वाहनांसाठी चालकाला लायसन्सची गरज नाही. यात रीमुव्हेबल बॅटरी दिली गेली असून ती सहज काढता येते आणि घरातील सामान्य सॉकेटच्या सहाय्याने चार्ज करता येते.

या गाड्यांचे बाकी डीटेल्स उघड केले गेलेले नाहीत मात्र या गाड्या एखाद्या लग्झरी कार्स इतक्या महागड्या असतील असे समजते. स्कूटरची किंमत ३५ हजार पौंड म्हणजे ३१ लाख रुपये असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment