अबब! १ कोटी ७८ लाखाची नाव

pod
इटली मध्ये जेट कॅप्सूल कंपनीने खास लग्झरी कॉम्पॅक्ट पॉड म्हणजे छोटी प्रवासी नाव तयार केली असून तिची मिम्मात आहे २,५०,००० डॉलर्स म्हणजे १ कोटी ७८ लाख रुपये. रॉयल व्हर्जन ००१ असे या नावेचे नामकरण केले गेले आहे.

pod1
ही छोटी नाव पाण्यावर एखाद्या वेगवान कारप्रमाणे धावते. २६ फुट लांब, १२ फुट रुंद अश्या आकाराच्या या नावेत पायलट म्हणजे ड्रायव्हरसह ८ ते १२ प्रवासी बसू शकतात. मागच्या भागात वॉशरूम आणि छोटा बार दिला गेला असून बुलेटप्रुफ काच नावेसाठी वापरली गेली आहे. या नावेचा टॉप स्पीड ताशी ७१ मैल म्हणजे ११४ किमी असून ग्राहकाच्या गरजेनुसार ही नाव सिंगल अथवा ड्युअल सेटअप मध्ये पेट्रोल आणि डीझेल इंजिन मध्ये बनवून दिली जाणार आहे.

Leave a Comment