छत्रपतींचे १३ वे वंशज संभाजीराजांकडे शाही कार्सचा संग्रह

sambhaji
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजे यांचे १३ वे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे अलिशान कार्सचे शौकीन आहेतच पण त्यांच्याकडे शाही आणि विंटेज कार्सचा चांगला संग्रह आहे. हेलिकॉप्टर पासून बुलेट बाईक असा कोणत्याची वाहनाने ते प्रवास करतात. त्यांची लाईफस्टाईल शाही आहे. ते भाजपचे राज्यसभा खासदार असून महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे ब्रांड अम्बेसिडर आहेत. अर्थात महाराजांच्या गड कोटाची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी ते हे काम करतात असे सांगितले जाते.

kafila
संभाजीराजे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जवळच्या माणसाना भेटायला जाताना हा राजा बुलेटवर सहज प्रवास करतो. त्यांच्या ताफ्यात अनेक विंटेज कार्स आहेत तश्याच आधुनिक लग्झरी कार्सही आहेत. रस्त्याने प्रवास करताना त्यांचा हा भलामोठा ताफा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.

maharaj
संभाजीराजे यांच्याकडे मर्सिडीज बेनझ जीएलए २५० डी, महिंद्र स्कॉर्पिओ, टोयटो फोर्च्युनर अश्या अलिशान गाड्या आहेत तसेच बुलेट बाईक आहे. संभाजीराजे यांनी एमबीए पूर्ण केले असून राजकारणात येण्यापूर्वीपासूनच ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत.

Leave a Comment