तुमची कुंडली निश्चित करते कसा असेल तुमचा जीवनसाथी…

LOVE
असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात. जीवनसाथी बद्दल प्रत्येकाचे अनेक स्वप्न असतात. जन्म झाल्यावर ग्रह, नक्षत्र आणि योग हा ठरलेलाच असतो. आपला जीवनसाथी कसा असेल त्याचा स्वभाव कसा असेल ठरलेले असते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहाची दिशा हे त्याचे प्रेमसंबंध दर्शवत असतो.

K
कुंडलीतशुक्र ग्रह प्रेमाच्या नात्याचे प्रतिक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्रला स्त्रीग्रह मानला जाते. शुक्र ग्रह हा प्रेमी-प्रेमिका, प्रेम संबंध, लक्झरी लाईफ, पति-पत्नीमधील संबंधावर आधारीत आहे. जन्मकुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती चांगली असल्यावर जीवनात प्रेमाचे आगमन होऊन चांगले नाते निर्माण होऊ शकते . जेव्हा शुक्र सोबतच चंद्र आणि मंगल यांचा चांगला समन्वय होते तेव्हा प्रेम संबंधामधील गोडवा कायम राहतो. शुक्र ग्रहचा परिणाम आकर्षण, सुख आणि सौंदर्य यावर होते. मंगळ हा ग्रह उत्साह आणि उत्तेजनाचे प्रतिक आहे.

LOVE1

ज्योतिष तज्ञांच्या मते, प्रेम संबंधाविषयी पुरुषांच्या पत्रिकेत शुक्र आणि स्त्रीच्या पत्रिकेत मंगल ग्रह गृहीत धरला जातो. मंगल ग्रह साहसाचे प्रतिक आहे त्यामुळे पुरुषाच्या पत्रिकेत शुभ मंगळ असेल तर तो धैर्यवान असतो. जर व्यक्तीच्या कुंडली शुक्र आणि मंगळचा चांगला योग झाला तर प्रेमात यश मिळण्याचे शक्यत अधिक असते.

Leave a Comment