महिलांवर लक्ष ठेवण्यासाठी Google आणि Appleने तयार केले अॅप

mobile
तंत्रज्ञानात दिग्गज असलेल्या कंपन्यांनी एक असे मोबाइल अॅप तयार केले ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर बऱ्याच महिला संघटनांनी टीका केली. खर तर, Google आणि Apple ने एक असे अॅप तयार केले आहे, ज्याच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. एक प्रकारे या कंपन्यांनी महिलांची हेरगिरी करण्यासाठी एक अॅप बनवले आहे. चला या अॅपबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
mobile1

mobile2
या अॅपचे नाव Absher असे असून हे अॅप विशेषकरून सौदी अरेबियातील पुरुषांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्याच्या माध्यमातून ते त्यांच्या घरात असलेल्या महिलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. स्त्रियांचा मागोवा घेता येणा-या Absher अॅपमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, जर स्त्री एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी पासपोर्ट वापरत असेल तर त्याची माहिती तिच्या पतीच्या फोनवर पाठवली जाईल. याशिवाय, या अॅपमध्ये अशी सुविधा देखील आहे की एखादी व्यक्ती आपल्या बायकोला घराबाहेर जाण्यापासून रोखू शकते. हे अॅप Google Play Store आणि Apple च्या App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
mobile2
या अॅपवरुन सध्या वादाची ठिणगी पडली आहे. बऱ्याच महिला संघटनांनी गुगल आणि अॅपलवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर हे अॅप स्टोअरमधून काढण्याची मागणी देखील आहे. सोदी अरेबियामध्ये घर सोडण्याच्या किंवा प्रवासासाठी महिलांना घराच्या पुरुष सदस्यांची कायदेशीर परवानगी घेतली पाहिजे.