भुपेन हजारिकांच्या मुलाचा भारत रत्न घेण्यास नकार

bhupen-hazarika
गुवाहाटी – प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांच्या मुलाने नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाच्या विरोधात मोदी सरकारकडून यावर्षी भारत रत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. अमेरिकेत राहणा-या भूपेन हजारिका यांचे पुत्र ताज हजारिका म्हणाले की, नागरिकत्व विधेयकामुळे राज्यात जन्मलेल्या सध्याच्या परिस्थितीत हा पुरस्कार घेणे योग्य नाही.

एका वर्तमान पत्राशी संवाद साधताना तेज म्हणाले, की भुपेन हजारिका जिवंत असते तर त्यांनी सध्याच्या परिस्थितीत ‘भारत रत्न’ पुरस्कार घेतला नसता. त्यांचा मुलगा असल्याने मी आसामच्या लोकांसाठी कमीतकमी एवढे तरी करू शकतो. तथापि, भूपेन हजारिका यांच्या कुटुंबात या विषयावर सामान्य मत नाही. त्यांचा भाऊ समर म्हणाला की, ‘भारत रत्न’ घेण्याचा निर्णय कोणी एका व्यक्ती ठरवू शकत नाही.

त्याच वेळी, भूपेन हजारिकाचा धाकटा भाऊ जयंत यांच्या पत्नी आणि गायिका मनीषा हजारिका यांनी सांगितले की, भुपेन दा हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे नव्हते. ते संपूर्ण देशासाठी भुपेन दा होते. त्यांच्यासाठी घोषित केलेला पुरस्कार घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय कोणीही घेऊ शकत नाही. 25 जानेवारी रोजी केंद्र सरकारने भूपेन हजारिका, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सामाजिक कार्यकर्ता नानाजी देशमुख यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार जाहीर केला होता.

Leave a Comment