असे आहेत गुगलच्या ‘अँड्रॉईड Q’ चे फिचर्स

android
या वर्षी गुगल लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड Q लाँच करणार असून अँड्रॉईड Q नावाने या ऑपरेटिंग सिस्टमला संबोधण्यात येणार आहे. अँड्रॉईड 10 Q असेही याला म्हटले जाऊ शकते. अँड्रॉईड डेव्हलपर्सनुसार गेल्या सर्व ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा उत्तम दर्जाची प्रायव्हसी आणि परमिशन फिचर्स गुगलच्या या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टममध्ये देण्यात येऊ शकतात.
android1
अँड्रॉईड 4.3 Jelly Bean मध्ये गुगलने सर्वात पहिले प्रायव्हसी परमिशन मॅनेजमेंट हे फिचर दिले होते. या सिस्टममध्ये “App Ops” च्या माध्यमातून परमिशन मॅनेज करण्यात येत होती. यानंतर अँड्रॉईड 4.4 KitKat मध्ये न्यू युझर कंट्रोलेबल परमिशन फिचरला App Ops इंटरफेससोबत जोडण्यात आले होते. त्यानंतर एक नवीन परमिशन फिचर अँड्रॉईड 6.0 Marshmallow मध्ये जोडण्यात आले होते. तुम्ही ज्याच्या मदतीने कोणत्याही अॅपच्या परमिशनला रोखू शकता किंवा परवानगी देऊ शकता. या ऑपरेटिंग सिस्टम नंतर अॅपच्या परमिशनला युझर स्वत:च मॅनेज करू लागले. अनेक अॅप्समध्ये कॅमेरा, कॉन्टॅक्ट आणि अन्य वैयक्तिक फाईल्सची परमिशन आपोआप मिळणे युझर्सच्या वैयक्तिक डेटाशी छेडछाड होण्याचा धोका अनेक पटीने वाढवतो. अँड्रॉईड 6.0 Marshmallow नंतर या सर्व अॅप्सच्या परमिशनला मॅनेज करण्यात येऊ लागले.
android2
युझर्सला एकासारखेच परमिशन फिचर अँड्रॉईड 6 ते अँड्रॉईड 9.0 Pie पर्यंत देण्यात येत आहे. युझर्स या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्या सोयीनुसार अॅपला परमिशन द्यायची किंवा नाही हे ठरवतात. युझर जर कोणत्या अॅपला फाईल, कॅमेरा किंवा कॉन्टॅक्टची परमिशन देणार नाही तर ते अॅप स्मार्टफोनचे कोणतेही फिचर एक्सेस करू शकणार नाही. पण अँड्रॉईड Q मध्ये केवळ लोकेशन परमिशनला रोखले जाऊ शकते. फोनच्या मायक्रोफोन आणि कॅमेराच्या परमिशनला तुम्ही रोखू शकत नाही. कोणत्याही अॅपच्या परमिशनला तुम्ही तेव्हाच बदलू शकता जेव्हा तो इनयुझ असेल. लोकेशन व्यतिरिक्त कोणत्याही परमिशनला रोखता येणार नाही.
android3
युझर्सला या शिवाय रिमाइंडरची सुविधा देण्यात येऊ शकते. युझरला ज्याच्या मदतीने स्मार्टफोन माहिती देत राहणार की त्याने लोकेशन एनेबल केलेले आहे. युझर या व्यतिरिक्त अॅप्सला दिलेल्या परमिशनला रिअल टाईम मॉनिटरिंग पण करू शकणार. अॅप्सला स्मार्टफोनच्या एक्सटर्नल स्टोरेजसाठी परवानगी द्यावी लागणार आहे. त्यानंतरच एक्सटर्नल स्टोरेजमधून फाईल एक्सेस करणे किंवा फाईल स्टोर करण्याची परमिशन मिळणार आहे.

Leave a Comment