अजित पवार म्हणतात, राज ठाकरेंनी आघाडीत “मनसे” यावे

ajit-pawar
मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समविचारी पक्ष म्हणून आघाडी सोबत यावे असे जाहिर आवाहन एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. दरम्यान मनसेला आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, सगळ्या विरोधक पक्षांनी मतविभाजन टाळण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारधारा एकत्र यायला हवे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मागील निवडणुकीत मनसेने एक लाख मते घेतली होती.

पहिल्यांदाच अजित पवार यांनी जाहीर वक्तव्य केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसे येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे अजित पवार यांनी मनसेने आघाडीत येण्याबाबतचे वक्तव्य केले असले, तरी पक्षाचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी मात्र मनसेसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे म्हटले होते. त्यातच काँग्रेसही मनसेला आघाडीत घेण्यासाठी इच्छुक नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी-युतीचे राजकारण जोर धरत आहे.