अमेरिका पुन्हा शटडाऊनच्या उंबरठ्यावर; ट्रम्प-विरोधक आमने सामने

Trump

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शटडाऊनचा सामना केल्यानंतर अमेरिका पुन्हा शटडाऊनच्या उंबरठ्यावर पोचली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्षातील चर्चा अयशस्वी ठरल्याने हे दोघेही आमनेसामने आले आहेत.

मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी निधीची मागणी केली आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाने याला विरोध केला आहे. त्यावरून कित्येक दिवस चाललेले शटडाऊन गेल्या महिन्यात संपुष्टात आले होते. मात्र आता चर्चा पुन्हा थांबली असल्यामुळे सरकारी कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 80 हजार कर्मचारी पगाराविना राहण्याची शक्यता आहे.

येत्या शुक्रवारी या संबंधातील कायदा मंजूर करण्यासाठी अमेरिकी संसदेला शुक्रवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  ट्रम्प आणि विरोधकांमध्ये सोमवारपर्यंत तडजोड होण्याची आशा होती. मात्र तडजोड होऊ न शकल्याने पेच निर्माण झाला आहे.

मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी 5.7 अब्ज डॉलरची मागणी केली होती. डेमॉक्रॅट सदस्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकी सरकारचे कामकाज 28 डिसेंबरपासून 35 दिवस ठप्प झाले होते. मेक्सिकोतून येणाऱ्याा शरणार्थ्यांना रोखण्यासाठी ही भिंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. गेल्याया महिन्या दोन्ही पक्षांनीीी तात्पुरती तडजोड करून ते शटडाऊन संपवलेेे होते.

Leave a Comment