हिरेनगरी सुरतचे स्ट्रीट फूडही लाजवाब

locha
देशाची हिरेनगरी सुरत येथे तुम्ही हिरे खरेदीसाठी जा, फिरण्यासाठी जा किंवा काही कामानिमित्ताने जा. कधीही गेलात आणि कोणत्याही कारणाने गेलात तरी येथील स्ट्रीटफूडचा आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका. रस्याकाठी असलेल्या छोट्या मोठ्या गाड्या, टपऱ्या आणि लहान मोठी दुकाने विविध प्रकारच्या ख्याद्यपदार्थांनी नुसती दरवळत असतात. येथील विविध पदार्थ खाणे ही एकप्रकारची खाद्य यात्रा म्हणायला हवी. अशी म्हण आहे की काशी येथे मृत्यू आला तर मोक्ष मिळतो, सुरत येथे खाल्ल्याने स्वर्गप्राप्ती होते.

एखादे काम बिघडले कि आपण लोचा झाला म्हणतो. सुरत मध्ये लोचा ए उल्फत नावाचा एक अप्रतिम चवीचा पदार्थ मिळतो. म्हणजे खमण बनविताना चुकून या पदार्थाचा शोध लागला असे सांगितले जाते. म्हणून त्याचे नाव लोचा. रात्री उशिरापर्यंत येथील खाद्यपदार्थ बाजार सुरु असतो. सायंकाळपासून पीपलोड येथे विविध पदार्धाच्या गाड्या उभ्या राहू लागतात आणि खमंग चाटचा वास वातावरण व्यापून राहतो.

ponk
येथील फेमस चाट कॉलेजियन नावाने मिळते आणि ते विद्यार्थी वर्गात विशेष पसंतीचे आहे. तीच बाब पोंक वडाची. हिरवी चटणी, तळलेली मिरची आणि मुगडाळ व ज्वारी पासून बनविलेले वडे हा दिवसाच्या कोणत्याही वेळी मिळणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे.

ghari
खमण संपूर्ण सुरतभर कुठेही मिळते पण हरबरा डाळ घालून बनविलेल्या स्पेशल चाटची चव विसरणे अवघड आहे. सुरत मिठाईसाठीही प्रसिद्ध आहे. येथे सुकामेवा खव्याच्या पारित भरून बनविलेली घरी नावाची मिठाइ आवर्जून खाल्ली जाते.

paan
पोटपूजा झाल्यावर पान हवेच. त्यासाठी चायना टाऊन समोर असलेल्या साईकृष्णा बनारसी पान शॉप पर्यंत जायला हवे. तेथे आईस पान नावाचा अफलातून विडा मिळतो. तो जरूर खावा.

Leave a Comment