श्रीलंकेला हवेत जल्लाद

hangman
श्रीलंकेच्या तुरुंग विभागाने सोमवारी दोन जल्लाद (फाशी देणारे) यांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. श्रीलंकेत गेली ४२ वर्षे फाशी शिक्षेवर असलेली बंदी राष्ट्रपती मैत्रीपाला यांनी काही दिवसांपूर्वी हटविली असून त्यानंतर लगेचच हि जाहिरात दिली गेली आहे. लंकेत शेवटची फाशी शिक्षा जून १९७६मध्ये दिली गेली होती.

श्रीलंका २०१६ साली मृत्युदंड बंदीसंदर्भात संयुक्त राष्ट्र देशांचा सदस्य आहे. तरीही राष्ट्रपतीनी फाशी शिक्षेवरील बंदी उठविली आहे. श्रीलंकेत अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यातील अनेक गुन्हेगार फाशीची शिक्षा सुनावले गेलेले कैदी आहेत. त्यांना येत्या दोन महिन्यात फासावर चढविले जाईल असे राष्ट्रपती मैत्रीपाला यांनी जाहीर केले आहे. १९७६ मध्ये शेवटची फाशी दिल्यानंतर २०१४ पर्यंत तेथे जल्लाद नोकरीत होता पण तो आता निवृत्त झाला असल्याने नवीन जल्लाद भरतीसाठी अर्ज मागविले गेले आहेत असे सांगितले जात आहे.

लंकेतील तुरुंगात अमली पदार्थ व्यापार संदर्भात फाशी झालेले ४८ गुन्हेगार असून त्यातील ३० जणांनी फाशी विरोधात अपील केले आहे. मात्र उरलेल्या १८ जणांना राष्ट्रपती त्यांना हवे तेव्हा सही करून फाशीची शिक्षा अमलात आणू शकतात असे तुरुंगाधिकारी म्हणाले.

Leave a Comment