मोबिस्टारच्या एक्स वन नॉच स्मार्टफोनची ऑफलाईन विक्री

mobistar
भारत स्मार्टफोनची वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ ठरल्यापासून जगातील अनेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन भारतात आणत आहेत. व्हिएतनामच्या अपकमिंग ब्रांड मोबिस्टारने त्यांचा उत्तम फिचर असलेला बजेट स्मार्टफोन एक्स वन नॉच भारतात ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.

प्रीमिअर डिझाईन, एआय पॉवर्ड कॅमेरे व हाय परफोर्मनस अशी त्याची वैशिष्टे सांगता येतील. या फोनला ५.२ इंची एचडी प्लस फुलव्ह्यू नॉच डिस्प्ले २.५ कर्व्हड ग्लाससह दिला गेला असून फ्रंट व रिअर ला १३ एमपीचा कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरा एआय टेक्निकसह असून फेस ब्युटी मोड सात ब्युटिफीकेशनश आहे.

अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस, फेस डिटेक्शन फिचर, फिंगरप्रिंट अनलॉक फिचर दिले गेले आहे. फोनला ट्रिपल कार्ड स्लॉट असून त्यात १ मायक्रो कार्ड आणि २ सीमची सोय आहे. २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज साठी ७८९९ तर ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज साठी ९४९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment