चीनमधील बर्फाच्या वादळात हजारो जनावरे ठार

china
पश्चिम चीनमध्ये आलेल्या भयंकर हिमवादळात हजारो जनावरे दगावली असून रस्त्यावर 18 इंचांचा बर्फाचा थर साचला आहे.

अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार क्विंगाई प्रांताच्या युशू तिबेटन स्वायत्त प्रदेश आला या हिमवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. अनेक अधिकाऱ्यांनी पशुवैद्यक औषधे आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणात या भागात पाठवल्या आहे असे झिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या भागातील गावे समुद्रसपाटीपासून 5,000 मीटर) (16,400 फूट) उंचीवर वसलेली  आहेत. तसेच या भागात जोरदार वारे वाहत असून बर्फही सरकत आहे त्यामुळे गरजेच्या वस्तू त्या भागात पोहोचविणे अवघड झाले आहे.

या गावातील गावकरी उपजीविकेसाठी जनावरांवर अवलंबून असतात. यात मुख्यत्वे याक, शेळ्या आणि मेंढ्या यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत चीनमधील अन्य ठिकाणीही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजधानी बीजिंगमध्ये किरकोळ बर्फवृष्टी झाली मात्र तेथील तपमान गोठनबिंदूच्या खाली गेले आहे, असे झिन्हुआने म्हटले आहे.

नुकतेच चिनी नववर्ष साजरे झाले आणि हे नववर्ष साजरे करून लाखो लोक घरी परतत आहेत. त्यांच्या वाहतुकीवर या हिमवादळामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment