‘या’ देश प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला साजरा केला जातो ‘व्हॅलेंटाईन डे’

valentines-Day
साधारण पणे दरवर्षी 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र जगात एक देश असा आहे की जेथे प्रत्येक महिन्याला ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो. या दिवशी मुली मुलांना आणि पत्नी आपल्या पतीला भेटवस्तू देतात. या देशाचे नाव आहे दक्षिण कोरिया. या देशाच्या अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. जी या देशाला इतर देशापासून वेगळी ओळख देते.
valentines-Day1
दक्षिण कोरियातील लोक 4 क्रमांकाला खुप घाबरतात. त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हाही 4 क्रमांक बोला जातो तेव्हा तो ‘मृत्यू’ सारखा उच्चारला जातो. म्हणूनच येथील लोक 4 या संख्येचा वापर टाळतात. या देशातील इमारती, हॉस्पिटल, शाळा, कार्यालयात चौथा मजला नसतो. म्हणजेच 4 या क्रमांकाचा वापर तेथे केला जात नाही. या देशातील लोक लाल शाईचा वापर करण्यास घाबरतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की लाल रंग हा मृत्यूचे प्रतीक आहे.
valentines-Day2
दक्षिण कोरियाला भारतासारखेचा 15 ऑगस्ट 1 9 45 रोजी जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार, कोठेही उभे राहून किंवा बसुन मद्यपान करु शकतात. बार, दुकाने आणि ट्रेनमध्ये ही मद्यपान करण्यास लोकांना सुट आहे. दक्षिण कोरियात एकाच आडनावाचे लोक एकमेकांशी लग्न करू शकत नाही. लोकांचा असा विश्वास आहे की त्यामुळे रक्ता अशुद्ध होते.
valentines-Day3
या देशात प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला ‘रोमँटिक डे’ असतो. या दिवशी मुली मुलांना आणि पत्नी आपल्या पतीला भेटवस्तू देतात. तर 14 मार्चला मुले या भेटवस्तूपेक्षा तीनपट अधिक खर्च मुली किंवा पतींवर खर्च करतात.

Leave a Comment