एक ही ट्विट न करता प्रियंका गांधींचे काही सेकंदात हजारो फॉलोअर्स

priyanka-gandhi
नवी दिल्ली : राजकारणापाठोपाठ सोशल मीडियावरही प्रियंका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधी ट्विटरवर @priyankagandhi या युजरनेमने अकाऊंट उघडून तरुणर्गाशी संवाद साधण्यासाठी सज्ज झाल्या असून ट्विटर हँडलवर प्रियंका गांधी वाड्रा असे नाव आहे. त्यांचे हँडल ट्विटरनेही तातडीने व्हेरिफाईड केले आहे.

प्रियंका गांधी यांचे हे अधिकृत ट्विटर अकाऊंट असून प्रियंका गांधी या काँग्रेसचे सरचिटणीस असल्याची माहिती ट्विटरच्या प्रोफाईलमध्ये देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणसीपदी नियुक्ती केली होती. प्रियंका गांधी यांनी याच पदाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय प्रवेश केला होता. त्यांनी आता सोशल मीडियावरुन तरुणाईशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्या केवळ सात जणांना प्रियंका गांधी या फॉलो करत आहेत. त्यात राहुल गांधी, काँग्रेस, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला या ट्विटर अकाऊंट्सचा समावेश आहे.

Leave a Comment