अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणखी एका महिलेची दावेदारी

elizabeth-warren
कमला हॅरीस आणि तुलसी गबार्ड यांच्या पाठोपाठ आणखी एका महिलेने अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दावेदारी दाखल केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट सदस्या एलिजाबेथ वॉरेन यांनी 2020 साली होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण उमेदवार असल्याचे शनिवारी जाहीर केले.

मॅसेच्युसेट्स येथील लॉरेन्स या शहरात झालेल्या एका सभेत एलिजाबेथ यांनी ही घोषणा केली. हे शहर 1912 साली झालेल्या ऐतिहासिक कामगार आणि महिलांच्या संपासाठी ओळखले जाते. यावेळी त्यांनी भांडवलदारांच्या विरोधात आपला लढा असल्याचे सांगितले. त्यामुळे कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीकडून आपण प्रचारासाठी पैसे घेणार नसल्याचे सांगत आपल्या विरोधकांनीही अशा प्रकारची शपथ घ्यावी असे आव्हान त्यांनी दिले.

दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉरेन यांच्या या दावेदारीचे स्वागत केले आहे. वॉरेन यांच्या या अप्रामाणिक प्रचाराला आणि समाजवादी कल्पनांना मतदार नाकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे याआधी कमला हॅरीस आणि तुलसी गबार्ड यांनी अध्यक्षपदासाठी दावेदारी व्यक्त केली आहे.

Leave a Comment