भारत आणि इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार – रिकी पाँटिंग

ricky-ponting
भारत आणि इंग्लंड यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी दिग्गज फलंदाज आणि सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. तर, विश्वचषक जिंकण्याची संधी ऑस्ट्रेलियाच्या संघालाही आहे.


ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल पाँटिंगला विचारले असता तो म्हणाला, की विश्वचषक ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो. सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारत आणि इंग्लंड विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. पाँटिंगच्या मते, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या वापसीनंतर ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघालाही विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. मी संघाचा साहाय्यक प्रशिक्षक या नात्याने बोलत नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी इंग्लंडमधील वातावरण अनुकुल असल्यामुळे संघ चांगली कामगिरी करू शकतो.

पाँटिंगने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ३ विश्वचषक जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागील २६ एकदिवसीय सामन्यात केवळ ४ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी संघ व्यवस्थापनाने रिकी पाँटिंगला संघाच्या साहाय्यक प्रशिक्षक बनवले आहे.

Leave a Comment