भारतात 3 पातीचे तर अमेरिकेत 4 पातीचे का असतात पंखे ?

fan

प्रत्येक घरामध्ये पंखा हा असतोच, मग ते भारत असो वा अन् देश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या पंख्यामध्ये असलेली पात्याची संख्या कमी- जास्त का असते.

fan1

भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला दिसते की, बहुतांशी तीन पाती असलेला पंख्याचा वापर केला जातो.
. तर विदेशात चार पाती असलेल्या पंख्याचा वापर होतो. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?

fan2

अमेरिका, रशिया यासारख्या थंडी असलेल्या देशांमध्ये चार पाती असलेल्या पंख्याचा वापर करतात कारण तेथे लोकांकडे एअर कंडीशनर (ए.सी) असल्याने ते पंख्याचा वापर एसीला पर्यायी म्हणून करतात. चार पातींचे पंखे हे तीन पातीवाल्या पंख्या पेक्षा मंद गतीने फिरतात. अमेरिकेतील लोकांना पंख्याची जास्त गरज भासत नाही. चार पातींचा पंखा हा रुममध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. या चार पातीचा पंख विदेशामध्ये जास्त वापरला जातो.

 

fan3

भारतामध्ये तीन पातींच्या पंख्याचा जास्त वापर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पंखा खूप आरामदायक असतो. तसेच सर्वाच घरांमध्ये ए.सी लावू शकत नाही. तीन पाती असलेले पंखे चार पाती असलेल्या पंख्या पेक्षा अधिक हलके असतात आणि जलद गतीने फिरतात. त्यामुळे भारतातील लोक तीन पाती असलेल्या पंख्यांचा वापर करतात.

Leave a Comment