आता अभिनयात पदार्पण करणार रॅपर बादशाह

badashaah
आपल्या रॅप गाण्याने चाहत्यांवर भूरळ पाडणारा बॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर बादशाह हा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अद्याप त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असून त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच या चित्रपटात अन्नु कपूर, कुलभुषण खारबांडा आणि नादिरा बब्बर हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

याबाबतची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली असून पंजाबमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. ‘हे वर्ष माझ्यासाठी नवनवीन संधी घेऊन आले आहे. बादशाहला सुरुवातीला रॅपर त्यानंतर निर्माता आणि आता अभिनेता बनण्याची संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच सोनाक्षीसोबत भूमिका साकारण्याची संधी मिळत, असल्यामुळे फार उत्सूक असल्याचे बादशाहने सांगितले आहे. बादशाहच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दास गुप्ता हे करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, महावीर जैन आणि मृगदीप सिंग लांबा हे करणार आहे.

Leave a Comment