आर्थिक मदतीसाठी इम्रान खान पुन्हा नाणेनिधीच्या दारात

imran-khan
आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) दारात गेले आहेत. आयएमएफकडून पाकिस्तानला कर्जमाफी मिळावी यासाठी ते चर्चा करणार आहेत.

दुबई येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने इम्रान खान हे आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लॅगार्ड येथे भेट घेतील, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी शनिवारी सांगितले.

“यातून आम्हाला आयएमएफची मते जाणून घेण्याची संधी मिळेल तसेच आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडू शकू,” असे चौधरी म्हणाले.

चौधरी हे अर्थमंत्री असद उमर यांच्यासोबत इम्रान खान यांच्यासह दुबईत उपस्थित असणार आहेत. दोन्ही बाजूने संमत असणाऱ्या कोणत्याही कर्जमाफीला पाकिस्तानची संमती असेल तसेच ही कर्जमाफी शेवटची असेल, असे ते म्हणाले. आयएमएफशी तडजोड ही समस्या नाही तर या तडजोडीसाठी असलेल्या अटी ही समस्या आहे, असेही ते म्हणाले.

या संदर्भातील चर्चा गेल्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र आयएमएफने टाकलेल्या अटी जाचक असल्याचे कारण पाकिस्तानने पुढे गेले होते . त्यामुळे ही चर्चा थांबली होती. कर्जमाफीच्या बदल्यात सरकारी खर्च कमी करण्याची अट आयएमएफ टाकण्याची शक्यता आहे.

हा मुद्दा निकाली निघाला नाही तर मोठे आर्थिक संकट येण्याचा धोका पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये व्यक्त केला होता. तसेच हा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत चीन व सौदी अरेबिया सौदी अरेबिया यांसारख्या मित्र देशांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता.

Leave a Comment