आता अॅमेझॉन अॅप्लिकेशनवरही मिळणार यूपीआय सुविधा

UPI
मुंबई : अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने भारतात पेटीएम आणि फोनपेला टक्कर देण्यासाठी स्वत:ची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरु केली असून आता अॅक्सिस बँकेशी संलग्न असलेली ही सुविधा सुरु करण्यात आली असून अॅमेझॉन अॅप्लिकेशनवर ही सुविधा मिळणार आहे.

यूजर्सना ही सुविधा सुरु करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याला यूपीआय अॅपशी लिंक करावे लागणार आहे. यानंतर पेटीएम, फोनपे या अॅप्सप्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकतात. बँक खाते क्रमांक आणि बँक आयएफएससी कोडची गरज यूपीआय सर्व्हिसमध्ये लागत नाही. फक्त व्हर्च्यूअल पेमेंट अॅड्रेसच्या साहाय्याने कुठेही पैसे पाठवता येतात.

बँकेत पैसे पाठवण्यासाठी किंवा काढण्यासाठी रांग लावावी लागत होती, सोबत अधिक वेळही खर्च व्हायचा. पण आता अशाप्रकारच्या अॅप्लिकेशन्समुळे बँकेतील रांगा कमी होण्यास मदत होत आहे. सोबत वेळही वाचत असल्यामुळे या अॅप्लिकेशनचा वापर सध्या पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मोठ्याप्रमाणात होत आहे.

डिजीटल इंडिया करण्यासाठी सरकारकडून भीम अॅप्लिकेशन सुरु करण्यात आले होते. अनेकांना ज्यामुळे त्याचा फायदा झाला होता. शिवाय गुगलपेसारखे अॅप्लिकेशन सुद्धा मोठ्याप्रमाणात वापरले जात आहे. अशात आता अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीनेही ही सुविधा सुरु केली आहे. शिवाय व्हॉट्सअॅप पण यूपीआय सुविधा सुरु करणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment