पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार नाना पाटेकर – अनिल कपूर

anil-kapoor
वेलकमच्या दोन्ही भागात झळकलेली उदय शेट्टी आणि मजनू भाई ही जोडी आता पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. पण ‘वेकलम’च्या दुसऱ्या भागाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. पण असे असले तरी या चित्रपटाचा तिसरा आणि चौथा भागही काढण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्यामुळे वेलकम ३ आणि वेलकम ४ हे एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहे.

वेलकम ३ आणि वेलकम ४साठी नाना पाटेकर, अनिल कपूर आणि जॉन अब्राहमच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २०२० पर्यंत वेलकम ३ आणि २०२१मध्ये वेलकम ४ प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांचा असणार आहे. नाना, जॉन, अनिल हे त्रिकुट वेलकम ३ मध्ये दिसणार असून तिसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची धुरा अहमद खान सांभाळतील, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

पुढील काही महिन्यात वेलकमचे चित्रीकरण सुरू होईल अशी देखील माहिती समजत आहे. ‘वेलकम’ चित्रपट २००७ मध्ये आला होता यात अक्षयसोबत कतरिना कैफ, मल्लिका शेरावत प्रमुख भूमिकेत होती. तर २०१५ साली आलेल्या वेलकम २ मध्ये जॉन आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत होते.

Leave a Comment