हरुन इंडिया फिलांथ्रोपीच्या यादीत अव्वल स्थानी मुकेश अंबानी

mukesh-ambani
नवी दिल्ली – हरुन इंडिया फिलांथ्रोपीच्या (परोपकारी) यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अव्वल स्थान मिळाले आहे. नुकतीच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ मुकेश अंबानी यांनी दरम्यान ४३७ कोटींचे दान दिले आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांनी २०० कोटींचे दान केले आहे. १ ऑक्टोबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान १० कोटी व त्याहून अधिक दान केलेल्या व्यक्तींची यादी हरुण रिसर्च इन्स्टीट्यूटने तयार केली आहे. यामध्ये एकूण १ हजार ५६० कोटींचे दान दिल्याचे म्हटले आहे. ३९ भारतीयांचा या यादीत समावेश आहे. सर्वात अधिक शिक्षणक्षेत्राला दान देण्यात आले आहे. त्यानंतर आरोग्य आणि ग्रामीण भागातील विकासाठी दान देण्यात आले आहे.

रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून अंबानी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधी (सीएसआर) हा देतात. त्यांची बार्कलेज हरुन इंडिया २०१८ च्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांची संपत्ती ३१ जुलै, २०१८ अखेर ३.७१ लाख कोटी रुपये एवढी आहे.

Leave a Comment