हिटलरच्या वस्तुंच्या लिलावावरुन संतापले न्यूरेमबर्गचे नागरिक

hitler
न्यूरेमबर्ग (जर्मनी) – न्यूरेमबर्गच्या नागरिकांकडून जर्मनीचा हुकमशहा राहिलेल्या अॅडॉल्फ हिटलरच्या पाच पेंटिग्स आणि इतर वस्तुंच्या लिलावावरुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत येथील स्थानिकांचे म्हणणे आहे, की आजही नाझी काळातील वस्तुंची प्रासंगिकता असल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात यावा.

या लिलाव प्रक्रियेची निंदा न्यूरेमबर्गचे महापौर उलरिच मैली यांनी केली असून त्यांनी हे चुकीचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. तर काही लोंकाचे म्हणने आहे की शिक्षण क्षेत्रात या वस्तुंचा उपयोग होऊ शकतो. जर्मनीत सध्या नाझी राजवटीतील वस्तुंच्या प्रदर्शनावर बंदी आहे.

सार्वजनिकरित्या नाझी राजवटीतील प्रतिकांचे प्रदर्शन करण्यावर जर्मनीत सध्या बंदी घालण्यात आली आहे. पण शैक्षणिक आणि ऐतिहासिक उपक्रमांच्या बाबतीत यात सुट देण्यात आली आहे. कायद्याचे आणि नियमांचे पालन करत लिलाव समुहाकडून या वस्तुंना सध्या झाकून ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment