न्यूझीलंडमध्ये एका तरुणीने हार्दिक पांड्याला प्रत्यक्षात केले ट्रोल

hardik-pandya
‘कॉफी विथ करण’मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने उधळलेली मुक्ताफळे त्याची पाठ एवढ्यात तरी सोडणार नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. क्रिकेट चाहत्यांनीही त्याला बीसीसीआयची कारवाई आणि वरिष्ठ क्रिकेटपटूंनी कान उपटल्यानंतर ट्रोल केल्यानंतर पांड्याला न्यूझीलंडमधील भारतीय क्रिकेट संघाच्या एका चाहतीने प्रत्यक्षात ट्रोल केले आहे.

पांड्याने दोन सामन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन केले, तरी त्याचे सोशल मीडियावर ‘मीम्स’च्या माध्यमातून ट्रोलिंग सुरुच आहे. न्यूझीलंडमध्ये भारताविरुद्ध दुसरा टी20 सामना सुरु असताना उपस्थित असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर नव्हे, तर प्रत्यक्षात पांड्याला ट्रोल केले. स्टेडियममध्ये बसलेल्या एका तरुणीने आपल्या हातात बॅनर धरला होता. तिने यावर ‘पांड्या, आज करके आया क्या?’ असा प्रश्न लिहिला होता. सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल होत आहे.