आमिर-माधुरीच्या ‘या’ चित्रपटाचाही येणार सिक्वल

dil
सध्या अनेक चित्रपटांचे सिक्वल बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत असून यात आशिकी, दबंग, हेट स्टोरी, एबीसीडी, डॉन, धमाल, मस्ती, हाऊसफुल या सारख्या चित्रपटांचा समावेश असून त्यात आता आणखी एक चित्रपटाची भर पडणार आहे. तो म्हणजे १९९० साली आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असलेला दिल या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. त्याकाळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

आजही त्या चित्रपटातील गाणी अनेकांची ओठांवर असतात. अशा या चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी घेतला आहे. दिलच्या सिक्वलचा विचार मी खूप दिवसांपासून करत असून याची स्क्रीप्टदेखील तयार असल्याचे इंद्र कुमार यांनी म्हटले आहे. आमिर आणि माधुरीची वर्णी यातदेखील लागणार असा प्रश्न केला असता. हे कलाकार यात दिसणार नसून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वलसाठी निश्चितच प्रेक्षकही उत्सुक आहेत.