राहुल गांधी नापास विद्यार्थी असून ते टॉपर विद्यार्थाचा तिरस्कार करतात – अरुण जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली – आपल्या आजारावर उपचार केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली शनिवारी अमेरिकेहून भारतात परतले असून ते भारतात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर हल्ला चढवला आहे.

अरुण जेटली यांनी आजारावर उपचार करुन परतल्यानंतर राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. जेटलींनी ट्विटरवर राहुल गांधी फेल विद्यार्थी असून ते टॉपर विद्यार्थाचा तिरस्कार करतात, असे लिहिले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

अरुण जेटली यांना टिश्यूचा कर्करोग आहे. ते त्याच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. त्यानंर ४ आठवडे तेथे उपचार घेतल्यानंतर शनिवारी ते भारतात परतले. अमेरिकेला ते असताना देशामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा अर्थमंत्र्याचा अतिरिक्त प्रभार पीयूष गोयल यांनी सांभाळला. त्यावेळी फेसबूकच्या माध्यमातून विरोधकांना जेटली यांनी उत्तरे दिली होती.

त्यांनी अमेरिकेहून परतल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षावर हल्लाबोल करणे सुरु केले आहे. राहुल गांधी हे नापास विद्यार्थी आहेत आणि ते टॉपर म्हणजेच नरेंद्र मोदी यांचा तिटकारा करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, राफेल प्रकरणावर काँग्रेसने खोटे आंदोलन उभे केले आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले आहे. त्यांचा खोटारडेपणा जास्त काळ टिकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment