2018 मध्ये ‘या’ 41 मोबाईल कंपन्यांनी सोडली भारतीय बाजारपेठ

htc

या महिन्याच्या सुरवातील केंद्रीय अर्थमंत्री याच्या अनुपस्थित अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, भारत सर्वात जास्त मोबाईल डेटा यूजर्स आहे, तसेच भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट होत आहे. गोयल पुढे म्हणाले, ‘पुढील 5 वर्षांत भारतातील 10 लाख गावांना डिजिटल गाव बनविले जाईल. मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची संख्या 268 वर पोहचली आहे जी आधी फक्त दोनच होती.’

दरम्यान सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार दावा करण्यात आला आहे की, 2018 मध्ये 41 स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घेतला आहे. तर 15 नवीन मोबाईल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.

या अहवालानुसार, भारतीय बाजारपेठेतील मोठे प्रतिस्पर्धा असल्यामुळे एसर, डाटाविंड, कोमियो, एचटीसी कंपन्या बंद कराव्या लागल्या आहे. तर असे म्हटले जात आहे की, 2019 मध्ये अनेक नवीन मोबाईल कंपन्या भारतात दाखल होणार आहे.

काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार, 2019 मध्ये नुबिया आणि रेजर सारख्या 15 कंपन्या पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. 2014-15 मध्ये सुमारे 300 मोबाईल कंपन्या भारतात कार्यरत होत्या, परंतु आता त्यांची संख्या 200 इतकी झाली आहे.