माही बनला ३०० टी २० खेळणारा पहिला खेळाडू

mahi
टीम इंडियाचा माजी कप्तान, विकेटकीपर आणि फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने रविवारी त्याच्या क्रीडा करियर मधील आणखी एक विक्रम नोंदविला. धोनी न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ३०० वा सामना खेळणारा भारतीय क्रिकेटपटू बनला. ३०० अथवा त्याहून अधिक टी २० खेळणारा धोनी जगातला १२ वा खेळाडू आहे. अर्थात हा विक्रम करताना धोनी केवळ २ धावा काढू शकला. त्याने आत्तापर्यंत ३८.३५ च्या सरासरीने २४ अर्धशतके ठोकत ६१३६ रन्स काढल्या आहेत. अर्थात टी २० मध्ये धोनीने एकही शतक नोंदविलेले नाही.

धोनीचा हा विक्रम फार काळ टिकणार नाही कारण रोहित शर्मा २९८ सामने खेळून त्याच्यापाठोपाठ आहे. त्यात धोनी वर्ल्ड कप नानात्र आंतरराष्टीय क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या किरण पोलार्डच्या नावावर असून त्याने ४४६ सामने खेळताना ८७५३ धावा काढल्या आहेत. त्यात त्याचे १ शतक आणि ४३ अर्धशतके आहेत.

Leave a Comment