माता मुंडेश्वरीला दिला जातो सात्विक बळी

kaimur
माघ महिन्यातील गुप्त नवरात्र ५ फेब्रुवारी पासून सुरु झाले असून देशातील बहुतेक सर्व देवी मंदिरात हे नवरात्र साजरे होत आहे. या काळात देवीची उपासना केली जाते. भारतात अनेक प्राचीन देवी मंदिरे आहेत. मात्र त्यात बिहारच्या कैमुर येथील मुंडेश्वरीमाता मंदिर काही कारणांनी वेगळे ठरते.

mundeshwari
हे प्राचीन मंदिर १९०० वर्षे जुने असल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतात. छोट्या टेकडीवर वसलेल्या या मंदिरात बळी देण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे हा सात्विक बळी असतो. म्हणजे बळी देण्यासाठी बकरा आणला जातो. त्याची पूजा करून पुजारी तांदळाच्या अक्षता देवीच्या पायाला स्पर्श करून या बळीसाठी आणलेल्या बकऱ्याच्या अंगावर फेकतात. त्याबरोबर हा बकरा मृतप्राय होतो. पुन्हा एकदा अक्षता देवीच्या चरणाला लावून बकऱ्याच्या अंगावर फेकल्या जातात तेव्हा बकरा पुन्हा शुद्धीत येतो. म्हणजे बकऱ्याचे प्राण घेतले जात नाहीत याला सात्विक बळी म्हणतात.

satwik
दुसरे म्हणजे शतकानुशतके या मंदिराचे संरक्षण मुस्लीम परिवार करत आहे. या मंदिरात दुर्गा माता वैष्णवी रुपात विराजमान आहे. तिचे वाहन महिष असून मंदिर अष्टकोनी आहे. येथील ९७ दुर्मिळ मूर्ती सुरक्षित राहाव्या म्हणून पटना येथील संग्रहालयात ठेवल्या गेल्या आहेत. मंदिरात सापडलेल्या शिलालेखात श्रीलंकेचा राजा दुत्तगामानी याची मुद्रा सापडली असून त्याने इसवी सन पूर्व १०१ मध्ये या मंदिरात देवी पूजा केल्याचे उल्लेख सापडतात.

Leave a Comment