ईवेस्ट मधून मिळालेल्या सोन्यातून बनणार ऑलिम्पिक पदके

medals
जपानची राजधानी टोक्यो येथे २०२० च्या जुलै ऑगस्टमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धात दिली जाणारी सुवर्ण, रजत आणि ब्राँझ पदके ईवेस्ट मधून मिळालेल्या सोने, चांदी पासून बनविली जाणार आहेत. यासाठी २०१७ पासून ईवेस्ट गोळा करून त्यातून धातू वेगळे करण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान सुरु केले गेले आहे. त्यातून आत्तापर्यंत १६.५ किलो सोने, १८०० किलो चांदी आणि २७०० किलो ब्राँझ मिळविले गेले आहे.

टोक्यो संघटन समिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हवा प्रदूषण कमी करणे आणि इ वेस्ट रिसायकल करून त्यातून धातू मिळविणे अशी मोहीम देशात एप्रिल २०१७ पासून सुरु झाली. या धातूपासून ऑलिम्पिक साठी ५ हजार पदके तयार केली जाणार आहेत. त्यासाठी मोबाईल फोन ऑपरेटर एनटीटी डोकोमो, जपान सरकार पर्यावरण सॅनिटेशन, टोक्यो मेट्रो यांनी सपोर्ट दिला तसेच नागरिकांनी जुने स्मार्टफोन, जुने इलेक्ट्रोनिक उपकरणे, लॅपटॉप, कॅमेरे दान म्हणून दिले. असा ५० हजार टन इ कचरा जमा झाला त्यातून धातू वेगळे केले गेले आहेत.

मुख्य ऑलिम्पिक स्टेडियम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार असून त्यातील ६० टक्के मटेरीयल रिसायकल करून मिळविले गेले आहे. येथील दिवे सोलरवर चालतील. हे स्टेडियम बांधण्यासाठी ११ हजार कोटी खर्च केले जात आहेत.

Leave a Comment