अस्वलांच्या उपद्रवामुळे रशियाच्या या शहरात आणीबाणी

bhalu
रशियाच्या उत्तर पूर्व भागातील नोवया जेम्लीया अर्चीपोलगो या छोट्या गावात ध्रुवीय अस्वलांमुळे आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे येथे रशियाचा एअरफोर्स आणि एअर डिफेन्स बेस आहे. या गावात ३००० लोकसंख्या असून येथे घरातून तसेच सार्वजनिक इमारतीतून हि अस्वले तळ ठोकून आहेत. या जातीची अस्वले माणसांवर जीवघेणे हल्ले करतात त्यामुळे येथील नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत आणि लोकांनीही मदतीचे आवाहन केले आहे.

लष्कराच्या रिकाम्या इमारतीतूनही या अस्वलांनी मुक्काम केला असून ती रस्त्यावर येणाऱ्या माणसांचा पाठलाग करत आहेत असे समजते. या अस्वलांवर काबू करता आला नाही तर त्यांना ठार करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. ध्रुवीय भागात राहणाऱ्या या अस्वलांवर वातावरण बदलाचा प्रतिकूल परिणाम होत आहे त्यामुळे ती खाद्याच्या शोधात भटकत आहेत. रशियात ही अस्वले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांच्या शिकारीला प्रतिबंध आहे असेही समजते.

Leave a Comment