हॉटयोगा गुरु विक्रम चौधरीच्या ताफ्यात १३ रोल्स रॉईस

hotguru
हॉट योगा गुरु अशी कीर्ती मिळविलेले मुलाचे कोलकाता येथील रहिवासी विक्रम चौधरी यांनी वयाचा अमृत महोत्सव १० फेब्रुवारीला साजरा केला. ५ हजार महिलांबरोबर लैंगिक संबध ठेवल्याचे आणि अनेक महिलांचे लैगिक शोषण केल्याचे आरोप झाल्यावरून वादग्रस्त ठरलेल्या या योगगुरु कडे अलिशान गाड्याचा प्रचंड संग्रह आहे. त्यांच्या ताफ्यात १३ रोल्स रॉईस, ८ बेन्टले, ३ फेरारी सह अनेक अलिशान कार्स आहेत. या गुरूने २२० देशात ७२० योगा स्कूल सुरु केली असून त्यांच्या शिष्य गणात मायकेल जॅक्सन, लेडी गागा, डेव्हिड बेकहम, अँडी मरे, जॉन क्लुनी असे अनेक नामवंत आहेत.

vikram
१० फेब्रुवारी १९४४ला कोलकाता येथे या गुरूचा जन्म झाला आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी योग करायला सुरवात केली. १३ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील योग चँपियनशिप मिळविली. ३५ ते ४० डिग्री तापमानात ते योगा शिकवीत असत व त्यावरून त्यांना हॉटयोगा गुरु असे नाव पडले. अल्पावधीत आपले साम्राज्य उभे करणाऱ्या या गुरूने १९७० मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले मात्र त्याच्यावर लैगिक शोषण केल्याचे आरोप होऊ लागल्यावर त्याला अमेरिकेतून पळ काढावा लागला असे सांगितले जाते.