दबंग हिरो सलमान किसिंग सीन पासून दूर

salmankh
सध्या जगभरात व्हेलेनटाइन सप्ताह साजरा केला जात आहे. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत साजऱ्या होत असलेल्या या सणात प्रत्येक दिवसाचे खास महत्व असते. त्यातील १३ फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून बॉलीवूड जगतातील एक खास बात सांगावीशी वाटते.

आजकाल बॉलीवूड चित्रपट खूपच बोल्ड झाले आहेत हे आपण पाहतो. चित्रपटात लिपलॉक म्हणजे किसिंग सीन ही आम बात बनली आहे. मात्र आपला दबंग हिरो सलमान खान गेली ३१ वर्षे बॉलीवूड मध्ये कार्यरत असूनही त्याने अद्यापि एकही लिपलॉक सीन दिलेला नाही. त्याने चित्रपटात नायिकेच्या कपाळावर ओठ टेकविले आहेत, मिठी मारली आहे पण किसिंग नाही.

वास्तविक त्याच्या पहिल्याचा मैने प्यार किया या चित्रपटात लिपलॉक सीन होता असे कुणी म्हणेल. पण त्याची खरी कहाणी वेगळीच आहे. त्या सिनेमात भाग्यश्री आणि सलमान यांनी लिपलॉक सीन द्यावा म्हणून निर्माते सुरज बडजात्या यांनी दोघानाही खूप समजावले पण दोघांनीही शेवटपर्यंत नकार कायम ठेवला. अखेर एका काचेच्या ग्लासला मध्ये ठेऊन हा सीन शूट केला गेला. त्यामुळे तो लिपलॉक म्हणता येणार नाही.

Leave a Comment