एमव्ही अगस्ता बाईक लिलावात विक्रमी बोली लागणार

agasta
फ्रांसच्या पॅरीसमध्ये १०० एमव्ही अगस्ता क्लासिक बाईक लिलावात ठेवल्या जात असून त्यातील ४८ वर्षे जुन्या बाईकला विक्रमी १ कोटीची बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक इटलीयान कुटुंबाच्या संग्रहालयातील या बाईक असून एमव्ही अगस्ता हा इटलीचा प्रसिद्ध रेसर बाईक ब्रांड म्हणून ओळखला जातो.

याच प्रकारातील एक एमव्ही अगस्ता ७५० ही बाईक १९७८ मध्ये ८८.५ लाखात लिलावात विकली गेली होती. तो विक्रम या लिलावात मोडला जाईल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत. काऊन्ट डोमेनिको अगस्ता यांनी १९४५ मध्ये ही कंपनी स्थापन केली. डोमेनिको यांचा १९७१ मध्ये मृत्यू झाल्यावर १९७६ पासून या बाईक रेसिंग मधून बाहेर गेल्या. मात्र त्यापूर्वी त्यांनी २७० ग्रांप्री, ३८ वर्ल्ड रायडर टायटल्स आणि ३७ वर्ल्ड कन्स्ट्रक्टर चँपियनशिप जिंकल्या आहेत. लिलावात ठेवण्यात येत असलेल्या १०० बाइक्स क्लासिक आणि दुर्मिळ आहेत. भारतात एमव्ही अगस्ताची चार मोडेल बाजारात आहेत.