दोनहून अधिक अपत्ये असणाऱ्यांना लढविता येणार नाही निवडणूक ?

supreme-court
नवी दिल्ली : दोनहून अधिक मुले असणाऱ्यांना यापुढे निवडूक लढवता येणार का ? अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून यातून निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना दोन मुलांचा नियम लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करावी आणि दोनहून अधिक मुले असलेल्यांना निवडणूकीत उभे राहण्याची परवानगी नाकारावी असेही यात म्हटले आहे.

या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत होऊ शकते. सरकारी नोकरी, सहायत्ता तसेच सबसिडीसाठी दोन मुलांचा नियम अनिवार्य करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच हा कायदा संबंधित राज्य स्तरावर लागू करुन गरजेचे बदल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही याचिका भाजप नेता आमि वकील अश्वनी उपाध्याय यांनी दाखल केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांचा निवडणूक लढण्याचा अधिकार काढून घ्यावा तसेच त्याचे संविधानिक अधिकारही काढून घेण्यात यावेत असेही म्हटले आहे.

Leave a Comment