प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचेही पूर्वज – रामदेव बाबा

ramdev-baba
नवी दिल्ली – योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज असल्यामुळे राम मंदिर अयोध्येत होणारच. अयोध्येत राम मंदिर होणार नाहीतर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा प्रश्न विचारत त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गाजतो आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढा अशी मागणी केली जाते आहे. हीच मागणी शिवसेनेसह देशभरातील साधू संतांनीही हीच मागणी केली आहे. पण पंतप्रधान मोदींनीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अध्यादेश काढण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही राम मंदिराचा प्रश्न चर्चिला जातो आहे. राम मंदिर नाही तर मत नाही असेही फलक लावण्यात आले होते.

Leave a Comment