भारतीय महिलांच्या सशक्तीकरणासाठी ट्रम्प सरकारच्या दोन योजना

donald-trump
भारतीय महिलांच्या सशक्तीकरणासाठी दोन योजनांची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने शुक्रवारी केली.

भारतात खासगी क्षेत्राच्या भागीदारीत दोन प्रकल्प सुरू करण्यात येतील. जागतिक पातळीवर पाच कोटी महिलांना सशक्त करण्याच्या ट्रम्प सरकारच्या ऐतिहासिक पावलाचचे एक अंग म्हणून हे कार्य करण्यात येईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. महिलांच्या जागतिक विकास आणि समृद्धीचा उपक्रम (डब्ल्यू-जीडीपी) सुरू करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे.

ट्रम्प यांचा कन्या तसेच ज्येष्ठ सल्लागार इवांका ट्रम्प या योजनेचे नेतृत्व करणार आहेत. यातील एक कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पेप्सिकोच्या भागीदारीत यूनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी काम करेल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

या संबंधातील करारावर स्वाक्षरी केल्यानंतर व्हाईट हाऊसच्या पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमचे लक्ष्य पाच कोटी महिलांपर्यंत पोचणे हे आहे आणि प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त महिलाही असू शकतील. वर्ष 2025 पर्यंत विकासशील देशांमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक महिलांपर्यंत पोचू आणि हे काम इवांका करेल.”

Leave a Comment