डीआरडीओची ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

helina
नवी दिल्ली – रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) यशस्वी चाचणी केली. ७ ते ८ किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याला भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राचा मारा हेलिकॉप्टरच्या मदतीने करता येतो.

दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी ही चाचणी ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी केंद्रात घेण्यात आली. डीआरडीने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र म्हणून या शस्त्राला ओळखले जाते. हे क्षेपणास्त्र इंफ्रारेड इमेजिंग सीकरच्या मदतीने कार्यान्वीत केले जाते. यापूर्वी राजस्थानच्या जैसलमेर येथे १३ जुलै २०१५ ला ३ टप्प्यात चाचणी करण्यात आली होती. तसेच मागच्या वर्षी १९ ऑगस्टलाही पोखरण येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

Leave a Comment