चंद्राबाबू नायडू करणार दिल्लीत आंदोलन, निदर्शकांसाठी 2 गाड्यांचे आरक्षण!

chandrababu-naidu
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू राजधानी दिल्लीत आंदोलन करणार आहे. या आंदोलनात भाग घेण्यासाठी आंदोलकांना नेण्याकरिता दोन रेल्वेगाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.

आंध्रप्रदेश पुनर्गठन कायदा आणि विशेष दर्जासारख्या अन्य आश्वासनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारच्या असहकाराच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊन आंध्र प्रदेश सरकारने या गाड्या आरक्षित केल्या आहेत. धर्म पोराट दीक्षा असे नाव या आंदोलनाला देण्यात आले आहे.

“आंध्रप्रदेश सरकारने दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबादकडून प्रत्येक 20 डब्यांच्या दोन विशेष गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक गाडी अनंतपुरहून आणि दुसरी गाडी श्रीकाकुलम येथून नवीन दिल्लीला जाण्यासाठी निघेल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे 11.02.2019 रोजी एका दिवसाच्या निदर्शनांत भाग घेण्यासाठी इच्छुक राजकीय पक्ष, संघटना, एनजीओ संघटना इत्यादी या गाडीने जातील,” असे सरकारी पत्रकात म्हटले आहे.

सरकारने विचारपूर्वक छाननी करून या गाड्यांसाठी 1,12,16,465 रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी दिली, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment