म्हणून रँडी झुकेरबर्गने फेसबुकला केला रामराम

randy
जगातील ५ नंबरची श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठ्या सोशल साईटचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग याची बहिण रँडी हिने फेसबुकला रामराम ठोकण्यामागचे कारण नुकतेच एका मुलाखतीत उघड केले आहे. आठ वर्षापूर्वी रँडीने फेसबुक सोडली होती.

रँडी म्हणाली फेसबुकची सुरवात २००४ साली झाली तेव्हा मार्कच्या सांगण्यावरून तिने हि कंपनी जॉईन केली होती तेव्हाच कंपनीत महिला कर्मचारी भागीदारी कमी आहे हे जाणविले होते. त्यावेळी तंत्रज्ञान इंडस्ट्रीमध्ये महिला कमी होत्या हे खरे असले तरी नंतरही महिलांची संख्या कंपनीत वाढली नाही. महिलांची भागीदारी जास्त असेल असे वातावरण मला हवे होते पण १५ वर्षे उलटूनही अजून परिस्थिती तीच आहे.

रँडी सांगते ती ज्या विभागात काम करत होती तेथे नाहीच पण अन्य विभागातही महिला कर्मचारी नव्हत्या आणि ते मला अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे २०११ साली कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. टेक्नोलॉजी क्षेत्रात पुरुष वर्गाची मक्तेदारी आहे ती मोडली गेली पाहिजे असे मला वाटते.

Leave a Comment