….तर भारतात बंद होऊ शकते व्हॉट्सअॅप

wtapp

भारतात व्यवसाय करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण भारत सरकार काही प्रस्तावित नियम आणत आहे. हे नियम जर लागू झाले तर व्हॉट्स अॅपसाठी अडचणी निर्माण होतील. असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

भारतात व्हॉट्सअॅपचे 20 दशलक्ष इतके महिन्याचे यूजर्स आहेत. कंपनीसाठी हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. व्हॉट्सअॅपचे जगभरात तब्बल 1.5 अब्ज यूजर्स आहेत.

व्हॉट्सअॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले की, “प्रस्तावित नियमांपैकी जे सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे, ते म्हणजे मॅसेजचा शोध घेणे.” फेसबुकच्या स्वामित्व व्हॉट्सअॅप डिफाल्ट मध्ये एंड-टू-एंड चा पर्याय आहे. यामुळे आता मॅसेज पाठविणारा आणि प्राप्त करणार यूजर्स फक्त मॅसेज वाचू शकतात. व्हॉट्सअॅप देखील यूजर्सचे मॅसेज वाचू शकत नाही.

वूग यांनी नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेतून व्हॉट्सअॅप बंद होण्याच्या शक्यता नाकारत म्हणाले की,” आम्ही यावर भारतासोबत चर्चा करणार आहोत.

Leave a Comment