ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्यात देखील कर्जबुडव्या माल्ल्याचे हात बरबटले?

vijay-mallya
नवी दिल्ली – ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या तारा आता देशातील कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या कर्ज बुडव्या विजय माल्ल्याशी जुळत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हा खुलासा पटियाला हाउस न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणीच्या वेळी केला. माल्ल्याच्या अडचणीत या गौप्यस्फोटानंतर आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

न्यायालयात ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा आरोपी दीपक तलवार याच्या अटकेची मुदत वाढवण्यासाठी हजर करण्यात आले होते. दरम्यान, ईडीने न्यायालयासमोर दीपक तलवार आणि विजय माल्ल्या या दोघांमध्ये फोनवरून बोलणे होत असल्याचा दावा केला. अनेक महत्वाच्या बाबी कसून चौकशी केल्यास समोर येतील, असा युक्तीवादही ईडीने केला आहे.

ऑगस्ट प्रकरणात ख्रिश्चियन मिशेल याची चौकशी झाल्यानंतर दीपक तलवार आणि त्याच्या एका सहकाऱ्याला दुबई येथून भारतात आणण्यात आले आहे. यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणात लाच घेण्यात आली होती, हेही समोर येण्याची शक्यता ईडीने वर्तवली आहे. तसेच, विजय माल्ल्याशी त्याचे संबंध होते आणि ऑगस्टा खरेदीच्या वेळी दोघेही संपर्कात होते, असे पुरावे मिळाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

५ फेब्रुवारीलाच ब्रिटिश गृह विभागाने पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचे प्रत्यार्पण लवकरच करून भारतात आणले जाणार, असे म्हटले जात आहे. २०१६ मध्ये माल्ल्या भारत सोडून फरार झाला होता. तेव्हापासून भारत सरकार त्याच्या मागावर आहे.

Leave a Comment