स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त !

suicide
जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ‘द बीएमजे’ मॅगझिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, साल 2016 मध्ये आत्महत्या करणाऱ्यामध्ये 44.2 टक्के लोक हे भारत आणि चीन या देशातील आहे.

साल 1 99 0 ते 2016 या काळात आत्महत्या करण्याऱ्याचे प्रमाण 6.7 टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, संशोधकांनी वयाचा आधार घेऊन आत्महत्याचा दराचा अभ्यास केला. तेव्हा जगभरातील आत्महत्यांचे जागतिक मृत्यु दर 33 टक्क्यांनी कमी झाले दिसून आले.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी असे आढळून आले की, स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्या ही सार्वजनिक आरोग्य आणि जागतिक समस्या बनली आहे. दरवर्षी सुमारे 8,00,000 लोक आत्महत्या करीत आहे. साल 2015 ते 2030 पर्यंत आत्महत्येचे प्रमाण एक तृतीयांशने कमी करण्याचे लक्ष्य जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) समोर आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही